Mumbai: राज्यात रविवारी एका दिवसात तब्बल 552 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 4,200 वर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात तब्बल  552 कोरोना बाधितांची नोंद झाली. एका दिवसातील ही राज्यातील सर्वाधिक वाढ झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,200 झाली आहे. आज 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 223 पर्यंत जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत 507 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज सापडलेल्या नवी रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबईतील 132 जणांचा तर त्याखालोखाल पुण्यात 49 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यातील सहा मृत्यू हे मुंबईत, चार मालेगाव आणि सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमधील प्रत्येकी एक मृत्यू आहे. रुग्णांची संख्या एकदम 552 ने वाढल्यामुळे राज्यापुढील काळजी वाढली आहे. विशेषतः मुंबई, पुण्यातील वाढते रुग्ण सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र आज मध्यरात्रीपासून प्रतिबंधित विभाग म्हणून जाहीर करण्यात आले असून दोन्ही महापालिकांच्या सीमा बंद करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील महापालिकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

  • मुंबई महानगरपालिका – 2724 (मृत्यू 132)
  • ठाणे – 20 (मृत्यू 2)
  • ठाणे महानगरपालिका- 110 (मृत्यू 2)
  • नवी मुंबई मनपा – 72 (मृत्यू 3)
  • कल्याण डोंबिवली – 69 (मृत्यू 2)
  • उल्हासनगर – 1
  • भिवंडी, निजामपूर – 5
  • मिरा-भाईंदर – 71 (मृत्यू 2)
  • पालघर – 17 (मृत्यू 1 )
  • वसई- विरार – 85 (मृत्यू 3)
  • रायगड – 13
  • पनवेल – 27 (मृत्यू 1)
  • नाशिक – 4
  • नाशिक मनपा – 5
  • मालेगाव मनपा – 78 (मृत्यू 6)
  • अहमदनगर – 21 (मृत्यू 1)
  • अहमदनगर मनपा – 8
  • धुळे -1 (मृत्यू 1)
  • जळगाव – 1
  • जळगाव मनपा – 2 (मृत्यू 1)
  • पुणे – 17 (मृत्यू 1)
  • पुणे मनपा – 546 (मृत्यू 49)
  • पिंपरी-चिंचवड मनपा – 48 (मृत्यू 1)
  • सातारा – 11 (मृत्यू 2)
  • सोलापूर मनपा – 15 (मृत्यू 2)
  • कोल्हापूर – 3
  • कोल्हापूर मनपा – 3
  • सांगली – 26
  • सिंधुदुर्ग – 1
  • रत्नागिरी – 6 (मृत्यू 1)
  • औरंगाबाद मनपा – 30 (मृत्यू 3)
  • जालना – 1
  • हिंगोली – 1
  • परभणी मनपा – 1
  • लातूर – 8
  • उस्मानाबाद – 3
  • बीड – 1
  • अकोला – 7 (मृत्यू 1)
  • अकोला मनपा – 9
  • अमरावती मनपा – 6 (मृत्यू 1)
  • यवतमाळ – 14
  • बुलढाणा – 21 (मृत्यू 1)
  • वाशिम – 1
  • नागपूर – 2
  • नागपूर मनपा – 67 (मृत्यू 1)
  • चंद्रपूर मनपा – 2
  • गोंदिया – 1
  • इतर राज्ये 13 (मृत्यू 2)

आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटीव्ह आले आहेत. तर 4,200 जण पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 368 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 6359 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23.97 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 87,254 लोक होम क्वॉरंटाईन असून 6,743 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.