-MPC-TOP-MOST-BANNER-I

Mumbai: गर्दी कमी करा, ‘वर्क फ्रॉम होम’वर भर द्या, अनावश्यक प्रवास टाळा – उद्धव ठाकरे

कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोनाशी लढा हे एक युद्धच आहे. हे विषाणूशी युद्ध आहे. भोंगा, सायरन वाजला असून युद्ध सुरु झाले आहे. सरकारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोनाशी लक्षण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनो घरातच राहा, गर्दी टाळा. स्वत:हून काही बंधने पाळा. गर्दी कमी करा, वर्क फ्रॉम होमवर भर द्या, अनावश्यक प्रवाश टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही ते म्हणाले.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 47 वर गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. हे व्हायरस विरुद्ध युद्ध आहे. तुम्ही सहकार्य करा, घर सोडू नका. विनाकारण बाहेर जाऊ नका. दिलेल्या सूचना तंतोतंत पाळा. कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ट्रेनची गर्दी ओसरली पण आणखी गर्दी कमी व्हावी. शासकीय कार्यालयात 50 टक्के गर्दी कमी केली आहे. हे परदेशी संकट आहे, असे ते म्हणाले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

स्टॅम्प मारलेल्या लोकांनी घराबाहेर फिरु नये. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतो. धार्मिक स्थळे बंद केल्याचे समाधन आहे. एकजुटीने शिवरायांच्या महाराष्ट्राची ताकद या संकटावर मात करेल. केवळ सहकार्याची अपेक्षा आहे. सरकार निर्णय घेऊ शकते. पण बंद करण्याची आवश्यकता भासू देवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.