Mumbai : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने उद्या बुधवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.

_MPC_DIR_MPU_II

थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार असून मुख्यमंत्री देखील राजीनामा देणार का या बाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.