Pune News : मुंबई – रीवा आणि पुणे- जबलपूर साप्ताहिक विशेष ट्रेनला मुदतवाढ

एमपीसी न्यूज : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन (Pune News) रेल्वेने मुंबई – रीवा आणि पुणे – जबलपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

02188 विशेष ट्रेन 30 डिसेंबर 2022 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेनला आता 31 मार्च 2023 पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

02187 विशेष ट्रेन 29 डिसेंबर 2022 पर्यंत प्रत्येक गुरुवारी चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेनला आता 30 मार्च 2023 पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

02131 पुणे – जबलपूर या सुपरफास्ट स्पेशल 26 डिसेंबर 2022 पर्यंत प्रत्येक सोमवारी चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेनला आता 27 मार्च 2023 पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

02132 जबलपूर – पुणे या सुपरफास्ट स्पेशल 25 डिसेंबर 2022 पर्यंत प्रत्येक रविवारी चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेनला आता 26 मार्च 2023 पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Pune News : इंदु राणी दुबे यांनी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्विकारला

ट्रेन चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 02188 आणि 02131 च्या वाढीव फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 01 डिसेंबर 2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.