Mumbai : विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त रितेश देशमुखने शेअर केला भावस्पर्शी व्हिडिओ

Riteish Deshmukh shared a Emotional video on the occasion of Vilasrao Deshmukh's 75th birth anniversary

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अभिनेता रितेश देशमुख  याने सोशल मिडीयावर एक भावस्पर्शी व्हिडिओ शेअर करून आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

रितेशने वडिल विलासरावांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश हँगरवर असणा-या एका कुर्ता-जॅकेट असलेल्या पेहरावाकडे जातो आणि मग त्यात एक हात टाकून व्हिडिओ शूट करतो.

हा व्हिडिओ पाहताना असं वाटतंय की विलासराव त्याच्या पाठीवर स्वतः हात फिरवत आहेत आणि रितेशने त्यांना मिठी मारली आहे. ‘अभी मुझमे कही बाकी थोडीसी है जिंदगी’, या गाण्यावर शूट केलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

रितेशने हा व्हिडिओ टिकटॉक आणि ट्वीटवरही शेअर केला आहे. या व्हिडिओला असंख्य लाईक मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे तसेच रितेश देशमुख याच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक देखील केले आहे.

विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त त्याने हा व्हिडिओ चित्रीत केला असून तो शेअर करताना त्याने ‘हॅप्पी बर्थडे पापा’, मी तुम्हाला दररोज मिस करतो. असं कॅप्शन दिले आहे.

सोशल मिडियावर रितेशचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रितेशने वडिलांना दिलेली ही अनोखी श्रद्धांजली सगळ्यांनाच आवडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.