Mumbai : रुद्राक्ष बँडचे ‘गझल रॉक’ हे नवे गाणे प्रदर्शित

एमपीसी न्यूज – बँड रुद्राक्षला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांचे ‘गझल रॉक’ नावाचे नवे गाणे Zee Music Co कडून प्रदर्शित करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे नवीन कलाकृतींची निर्मिती होत नसल्याने रसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साई पियूष यांच्या बँड रुद्राक्षला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली.

त्यानिमित्ताने त्यांचे गझल रॉक नावाचे नवे गाणे Zee Music Co कडून प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकतेच हे गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून रासिंकासमोर आले असून संगीत प्रेमीची त्याला चांगलीच पसंती मिळत आहे.

साई पियूष यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे गौरव बुरसे यांनी गायले आहे. या गाण्यासाठी हार्मोनिअम पियूष कुलकर्णी, ड्रम्स साईप्रसाद निंबाळकर, गिटार आशिष जाधव यांची साथ लाभली आहे. या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

व्हिडिओ गाण्याची लिंक -https://www.facebook.com/zeemusiccompany/videos/703267490439795/?sfnsn=wiwspmo&extid=Q6pN6e5EkLCa3Xkg&d=n&vh=e

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.