Mumbai: सरपंचांचे थकीत मानधन होणार खात्यावर जमा, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

Mumbai: Sarpanch's overdue honorarium to be credited to account says Rural Development hasan mushrif सरपंचांना सध्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार प्रतिमाह 3 ते 5 हजार रुपये इतके मानधन देण्यात येते.

एमपीसी न्यूज- राज्यातील सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.

सरपंचांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत शासनाने नुकतेच शासन निर्णय जाहीर केले आहेत.

सरपंचांना सध्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार प्रतिमाह 3 ते 5 हजार रुपये इतके मानधन देण्यात येते.

सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित असून ते तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या होत्या.

ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेले चांगले काम तसेच लॉकडाऊनच्या काळात घटलेली करवसुली पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कर्मचाऱ्यांनाही त्यांचे संपूर्ण वेतन देण्याची कार्यवाही राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

हे वेतन संबंधित ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल. त्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.