Mumbai : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी; 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण 9 जागांसाठी येत्या दि. 21 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 14 मे 2020 आहे.

नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :
गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा), संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.). उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना). शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी). राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.).

नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्या उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :– राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.