Mumbai : शाहरुख खानचे महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 25,000 पीपीई किट्सचे योगदान

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. त्याचबरोबर या विषाणूशी लढण्यासाठी इतर सुरक्षा साधनांची सुद्धा कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून या साधनांची कमतरता भरून काढण्यासाठी मदत दिली जात आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकार सुद्धा मागे नसून नुकतेच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांने महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 25,000 पीपीई किट्सचे योगदान दिले आहे.

कोरोना या साथीच्या आजारामुळे संपूर्ण देश घरात बंदिस्त आहे. आरोग्य सेवक या आजाराविरूद्ध रात्रंदिवस लढा देत आहेत. महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सुपरस्टार शाहरुख खानने 25,000 पीपीई किट उपलब्ध करुन दिल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य व कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे या कामासाठी आभार मानले आहेत.

शाहरुख खान यांनी सुद्धा राजेश टोपे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. किट्स स्रोतासाठी आपल्या सर्व मदतीबद्दल धन्यवाद सर. स्वतःचे आणि मानवतेचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात आपण सर्वजण एकत्र आहोत. या सेवेचा आनंदच आहे. आपले कुटुंब आणि आरोग्य कर्मचारी सुरक्षित आणि निरोगी राहावी अशी प्रार्थना.

शाहरुख खानने याच्या अगोदर पंतप्रधान सहाय्यता निधी तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली होती. तसेच आवश्यकता भासल्यास काही मदत पुढील काळासाठी राखून ठेवण्याचे त्याने सांगितले होते. मीर फाउंडेशन, रेड चीलीज एंटरटेनमेंट आणि गौरी खान प्रोडक्शन तर्फे ही मदत देऊ केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.