Mumbai : अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही – शरद पवार

शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार संयुक्त पत्रकार परिषद

एमपीसी न्यूज- राज्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन केले. या घटनेच्या प्रतिक्रिया आता बाहेर पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा दस्तुखुद्द शरद पवार यांनी या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. आज दुपारी साडेबारा वाजता शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. 

अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे अजित पवार यांनी बंड केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, आज दुपारी साडेबारा वाजता शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुपारी3 वाजता भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.