Mumbai: शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश

आज संध्याकाळी उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार- अशोक चव्हाण 

 एमपीसी न्यूज- पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज संध्याकाळी पुण्याच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक राजकीय पक्षाकडून पाहावयास मिळत आहे. अशीच तयारी महाराष्ट्रात देखील पाहण्यास मिळत असून त्या पार्श्वभुमीवर राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये पुण्याच्या जागेसाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करून आठवडा उलटला. आघाडीकडून माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे आणि शेकाप नेते प्रवीण गायकवाड यांच्या नावाची  चर्चा सुरू होती. मात्र अद्यापपर्यंत उमदेवार घोषित करण्यात आला नाही.

  • त्यात अरविंद शिंदे यांचे नाव आघाडीवर असताना. शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे पुण्यातील काँग्रेस मंडळीकडून मागील दोन दिवसापासुन सांगितले जात होते. त्या दृष्टीने अरविंद शिंदे यांनी तयारी देखील केली असताना. त्याच दरम्यान आज मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड या दोघापैकी एकाला काँग्रेस संधी देणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

पुण्याच्या जागेबाबतआज संध्याकाळ पर्यंत नाव जाहीर केले जाणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. प्रदेश अध्यक्षानी पुण्याच्या जागेबाबत सांगितले. आज नाव जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात करणार अशी भावना कार्यकर्त्याकडून ऐकण्यास मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.