Mumbai : धक्कादायक!; मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – मुंबईमध्ये 53 पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. या दरम्यान 168 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या चाचणी अहवालानुसार 168 पैकी 53 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना बाधित बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजत आहे.

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकांराच्या कोरोना चाचणीसाठी महापालिकेला विशेष कॅम्प आयोजित करण्यास सांगितले होते. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये बर्‍याच जणांना करोनाची कोणती लक्षणेही नव्हती. अद्याप काही पत्रकारांच्या चाचणीचा अवहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे या संख्येत आणखी वाढ होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

पत्रकारांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क, सॅनिटायझर व इतर सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.