mumbai : जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकाने बंद ठेवा – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईतील बस आणि लोकल बंदचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकरांसोबत बोलताना केले.

सध्या राज्यात कोरोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर या आजाराने एकाच मृत्य झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश असून, या पैकी एकजण गंभीर आहे. तर उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्के उपस्थितीबाबत विचार सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व धर्मीय धर्मगुरूंनी आपली धार्मिक स्थळे बंद ठेवावीत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.