Mumbai : श्रुती हासनची वडील कमल हासन यांच्याबद्दलची प्रांजळ कबुली

एमपीसी न्यूज : अभिनेते कमल हासन यांची कन्या आणि अभिनेत्री श्रुती हासन हिने नुकताच सोशल मिडीयाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिला एका चाहत्याने ‘तुला आतापर्यंत मिळालेली सर्वात वाईट शिक्षा कोणती?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर श्रुतीने दिलेल्या उत्तराने कमल हासन यांचे त्यांच्या मुलींवरचे जीवापाड प्रेम असल्याचे दिसत आहे.

‘माझ्या वडिलांनी मला कधीच शिक्षा दिली नाही किंवा माझ्यावर ओरडलेही नाहीत. त्यांना असे वागणे आवडत नाही. पण एकदा मी चुकी केली होती तेव्हा मी तुझ्यावर खूप नाराज आहे इतकंच ते मला म्हणाले होते’ असा खुलासा श्रुतीने केला.

श्रुती हासनने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता तेव्हा चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली होती. सध्या लॉकडाउनमुळे सर्वचजण घरात अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसत आहे.

या यादीमध्ये मोठमोठ्या कलाकारांचा देखील समावेश आहे. ते लॉकडाउनमुळे आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतच आहेत, पण त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी देखील संवाद साधत आहेत.

त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्याने तुझे वडील कमल हसन सध्या कुठे आहेत, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ते चेन्नई येथे असून त्यांनी स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे’ असे श्रुतीने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.