Mumbai: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण

Mumbai: Social Justice Minister Dhananjay Munde also held corona positive कोरोना होणारे मुंडे हे मंत्रिमडळातील तिसरे मंत्री ठरले आहेत. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती.

एमपीसी न्यूज- कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह आणखी 5 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

या पाच जणांमध्ये त्यांचा मुंबईतील वाहन चालक, बीडचा वाहनचालक, बीडचा स्वयंपाकीचाही समावेश आहे. या सर्वांच्या चाचणीचे अहवाल गुरुवारी रात्री आले.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना होणारे मुंडे हे मंत्रिमडळातील तिसरे मंत्री ठरले आहेत. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनाही कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. उपचारानंतर तेही आता ठणठणीत झाले आहेत.

सर्वात पहिल्यांदा मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती.  त्यांनी कोरोनावर मात केली होती. मुंडे यांना कोरोनाची लागण कशी झाली हे समजलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.