Mumbai: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात

Social Justice Minister Dhananjay Munde defeats Corona

एमपीसी न्यूज – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून आज, सोमवारी मुंडे यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

सामाजिक न्यायमंत्री, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनजंय मुंडे यांना 12 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील 11 दिवसांपासून मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते.

11 दिवसाच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आज सायंकाळी त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. मुंडे यांच्या समर्थकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. याबाबतचे वृत्त  वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

दरम्यान, याआधी राज्य मंत्रीमंडळातील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री, काँग्रेस नेते  अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोनही मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.