Mumbai : एका समाजाकडून दुस-या समाजावरील अत्याचाराविरोधात कडक कारवाई करा-अनिल देशमुख

Mumbai: Take stern action against atrocities from one community to another: Anil Deshmukh

एमपीसी न्यूज – एका समाजाकडून दुस-या समाजावर होणारे अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अत्याचार करणा-या संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यात कोणत्याच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा दोषींविरुद्ध तात्काळ व अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. असा सज्जड इशारा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य आहे. या राज्यात गोरगरीब, दीनदुबळ्यांवर अन्याय अत्याचार होता कामा नये.

राज्यात काही ठिकाणी एका समाजाकडून दुस-या समाजावर अन्याय करण्याच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले आहेत. अशा प्रकारच्या घटना जर राज्यात घडल्या तर पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.