Mumbai : लग्नाबाबतच्या चर्चेवर तमन्ना भाटिया म्हणते, ‘नही, नही, अभी नही…!’

एमपीसी न्यूज : ‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामुळे फेमस झालेली अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तमन्ना चक्क पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. आधीच टेनिस क्वीन सानिया मिर्झा शोएब मलिकबरोबर लग्नाच्या बंधनात अडकली आहे. आता कोणती बरं अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटरशी सूत जुळवणार असा चाहत्यांना नक्कीच प्रश्न पडला असणार. त्यातच तमन्ना आणि अब्दुल रज्जाकच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या होत्या.

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटातील भूमिकांसोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपले आवडते कलाकार कोणाला डेट करत आहेत हे जाणून घ्यायला चाहते फार उत्सुक असतात.

काही दिवसांपूर्वी तमन्ना आणि अब्दुल रज्जाक यांचा एका ज्वेलरीच्या दुकानातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोमध्ये दोघांच्याही हातात सोन्याचे दागिने होते. त्यांचा हा फोटो पाहून ते दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

पण आता तमन्नाने त्या फोटोमागील सत्य सांगितले आहे. २०१७ मध्ये दुबईमधील एका इव्हेंटसाठी तमन्ना आणि अब्दुल रज्जाक यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो २०१७ मधील असल्यामुळे लग्नाच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत, असे तमन्नाने म्हटले आहे.

‘पहिले माझे नाव एका अभिनेत्यासोबत जोडण्यात आले, नंतर एका क्रिकेटरसोबत आता डॉक्टरसोबत. माझे नाव अनेकांसोबत जोडण्यात आले आहे. माझ्या खासगी आयुष्याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत’, त्यामुळे सध्या तमन्ना म्हणतेय, नही, नही अभी नही….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.