Mumbai : ‘ती’ फाईट आठवली की आजही मला माझं शरीर काळं निळं पडल्याचा भास होतो – पुनीत इस्सार

Mumbai: 'That' fight reminds me that even today I feel like my body has turned blue - Puneet Issar

एमपीसी न्यूज : ‘रामानंद सागर यांच्या महाभारत या मालिकेत मला दुर्योधन साकारता आला. परंतु, भीमासोबत केलेली ती शेवटची फाईट मी कधीही विसरणार नाही. या दृश्याचं चित्रीकरण जवळपास १८ दिवस सुरु होतं. भर उन्हात खांद्यावर वजनदार गदा घेऊन मला उन्हात उभं केलं जायचं. यामुळे माझ्या शरीरावर काळे निळे डाग पडले होते. ती फाईट आठवली की आजही मला माझं शरीर काळं निळं पडल्याचा भास होतो’,  अशी आठवण अभिनेते पुनीत इस्सार यांनी नुकतीच एका मुलाखतीत सांगितली.

सध्या करोनाच्या साथीमुळे लोक घरातच लॉकडाऊन होऊन पडले आहेत. अशावेळी त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून गाजलेल्या जुन्या मालिका दूरदर्शनवरुन दाखवण्यात येत आहेत. सुरुवातीला ‘रामायण’ मग ‘महाभारत’ या मालिका दाखवण्यात आल्या. अभिनेते पुनीत इस्सार यांनी ‘महाभारत’ या मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारली होती.

तो माझा ड्रिम रोल होता. दुर्योधनासाठी निर्मात्यांना बलदंड शरीराचा अभिनेता हवा होता. माझं पिळदार शरीर पाहून त्यांनी मला ही भूमिका साकारण्याची संधी दिली. या भूमिकेत सर्व काही ठीक होत, ती फाईट आठवली की आजही मला माझं शरीर काळं निळं पडल्याचा भास होतो’ , अशी आठवण अभिनेते पुनीत इस्सार यांनी सांगितले.

त्याआधी अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या जीवघेण्या अपघाताच्या सीनमध्ये पुनीत होते. प्रेक्षकांचा असा समज होता की, पुनीत यांच्यामुळे अमिताभ यांना अपघात झाला. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. मात्र, त्यामुळे पुनीत यांच्या करियरवर परिणाम झाला. त्यांना काम मिळत नव्हते.

त्यातच बी. आर. चोप्रा यांनी ‘महाभारत’ या मालिकेमध्ये पुनीत यांना दुर्योधनाचा रोल दिला. तो रोल त्यांनी अत्यंत ताकदीने साकारला. त्यामुळे त्यांना पुन्हा काम मिळू लागले.

या मालिकांच्या निमित्ताने अभिनेता पुनीत इस्सार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याबद्दल बोलताना महाभारतमधील भीम विरुद्ध दुर्योधन हा फाईट सीन पाहिला की आजही माझं शरीर काळं निळ पडतं असा आश्चर्यचकित करणारा खुलासा पुनीत इस्सार यांनी केला आहे.

महाभारत ही मालिका पुनप्रसारित होताना आजही सुपरहिट ठरत आहे. त्यामुळे तेव्हा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे हे कलाकार आज काय करत आहेत याचे प्रेक्षकांना कुतुहल आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.