Mumbai: उद्योग विभागाची घोडदौड सुरूच; दोन उद्योगांसोबत 1 हजार 17 कोटींचे सामजंस्य करार

The industry department's horse race continues; MoUs worth Rs 1,017 crore with two industries

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने 16 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यानंतर आज पुन्हा दोन महत्त्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार 17 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन तसेच संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पहिला 900 कोटी रुपयांचा गुंतवणूक करार सुप्रसिद्ध डीबीजी इस्टेट कंपनीसोबत करण्यात आला. याद्वारे 2700 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

ही कंपनी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांसाठी लॉजिस्टिक पार्क तयार करणार आहे. ही कंपनी भिवंडी येथे लॉजिस्टिक क्षेत्रात काम करणार आहे.

दुसरा गुंतवणूक करार जपानच्या आयडीयल केमी प्लास्ट कंपनीसोबत 117 कोटींचा करण्यात आला आहे. ही कंपनी अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे आपला उद्योग सुरू करणार आहे.

या ठिकाणी 88 जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. संबधित कंपनी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like