Mumbai : महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात 'राष्ट्रपती राजवट' लागू करण्यासाठी पाठविले राष्ट्रपती यांना पत्र

एमपीसी न्यूज – सध्या महाराष्ट्र राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. तसेच कोणतेही पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन करण्यास अनुकूल नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ‘भारतीय संविधान’च्या कलम 356 नुसार ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यात यावी, या आशयाचे अहवाल वजा पत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सन्माननीय राष्ट्रपती यांना पाठवले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार असल्याचे समजत आहे.

या अगोदर राज्यात भाजपने बहुमत नसल्याने स्थिर सरकार आपण स्थापन करू शकणार नसल्याचे राज्यपाल यांना सांगितले. त्यामुळे राज्यपाल यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या पक्षाला अर्थात शिवसेनेला राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, दिलेल्या वेळेत शिवसेनाही स्थिर सरकार स्थापन दावा करू शकले नाही.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता तीन क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या पक्षाला अर्थात राष्ट्रवादीला स्थिर सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच त्यांनाही आज रात्री 8.30 पर्यंत वेळ दिला आहे.

तरीही राज्यात कोणतेंही पक्ष जर स्थिर सरकार स्थापन करू शकत नसेल तर, महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यात यावी, या आशयाचे अहवाल वजा पत्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सन्माननीय राष्ट्रपती यांना पाठवले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात ‘भारतीय संविधान’च्या कलम 356 नुसार ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार का? कि राष्ट्रवादी स्थिर सरकार स्थापन करू शकेल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. जर कोणताही पक्ष स्थिर सरकार स्थापन करू शकला नाही तर, राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होईल, असे समजत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.