Mumbai: लॉकडाऊनवर शॉर्टफिल्म The Empty Space, एका ओळखीच्या अनोळखी नात्याची गोष्ट! (Video)

Mumbai: The short film The Empty Space on Lockdown, the story of an acquaintance's unfamiliar relationship!

एमपीसी न्यूज – नात्यातलं रितेपण तेव्हा जाणवतं जेव्हा लॉकडाऊन असतो एक असंच नातं होतं जे या लॉकडाऊनने दाखवले The Empty Space ही अशाच एका ओळखीच्या अनोळखी नात्याची गोष्ट आहे!

आपल्या जिवलगाला आपल्या मनातलं खूप काही सांगायचं असतं त्या क्षणी असलेला दुरावा हा खूप मोठा असतो, पण कधीतरी मनाचा मनाशी चाललेला संवाद हा अचानक मनातली भावना ही समोर आणतोच. त्यावेळी चेहऱ्यावर उरतं फक्त एक हसू, अन एका निखळ नात्याची कबुली, ते नातं त्या संवादातून हृदयात खूप खोलवर रुतत जातं अन तिथे आपलं अढळ स्थान मिळवतं.

हा चित्रपट आणि त्यातले कलाकार तंत्रज्ञ हे घराच्या बाहेर न पडता काहीतरी सांगू पाहत होते जे आपल्या जवळचं होतं ती गोष्ट सांगण्यासाठी अडचणी होत्या पण तरीही शेवटी ती गोष्ट त्यांनी मांडलीच, दिग्दर्शक अमेय परुळेकर यांनी ही गोष्ट आपल्या समोर आणली.

लॉकडाऊनच्या काळातली ही हरवलेल्या नात्याची गोष्ट आहे, या चित्रपटात राजीव चुरी आणि रागिणी चुरी यांनी अभिनय केला आहे. तर चित्रपटाचे संवाद हर्षल आल्पे यांनी लिहिलेले आहेत, कथा, संकल्पना अमेय परुळेकर आणि रिया बराय यांची आहे, तर संकलन उमेश गुरव यांची आहे.

या चित्रपटाचे अजून वैशिष्ट्य म्हणजे लॉकडाऊन असल्याने कोणीही आपल्या घरातून बाहेर न पडणे ही मुख्य गोष्ट असल्याने यातील अभिनय करणाऱ्या कलाकारांनीच या चित्रपटाचे छायांकन केले आहे, सराव नसल्याने अडचणी होत्या पण सगळ्या अडचणींवर मात करुन, आणि त्यासाठी अन केलेल्या कामासाठी कुठलेही मानधन न घेता फक्त कलाकृतीची प्रामाणिक राहून काम केले आहे.

एक छान कलाकृती या लॉकडाऊनच्या काळात लोकांसमोर आणण्याचा आणि त्यांना घर बसल्या विरंगुळा देण्याचा, आणि त्यातून होकारात्मक संदेश देण्याचा क्युरिऑसिटी आणि ‘आपला कट्टा’च्या टीमचा प्रामाणिक प्रयत्न वाखाण्याजोगा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.