Mumbai : राज्यसेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

एमपीसी न्यूज – नोवेल कोरोना (COVID-19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दि. 22 मार्चच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दि. 26 एप्रिल व दि. 10 मे ला आयोजित करण्यात आलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

या दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. तसेच परीक्षेचे दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एस.एम.एस. द्वारे माहिती देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.