Mumbai : राज्यात आज 2940 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 1084 रुग्णांना डिस्चार्ज 

The state today recorded 2940 new corona patients; Discharge to 1084 patients

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शनिवारी 2940 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 65, 168 वर पोहोचली आहे. पैकी सध्या राज्यात 34,881 सक्रिय रुग्ण आहेत.  राज्यात आज 99 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2197 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात 1084 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज झालेल्या 99 मृत्यूपैकी 40 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 6 ते 27 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 59 मृत्यूपैकी मुंबई 35, पनवेल 7, ठाणे 6, वसई विरार 6, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 1, जळगाव 1 तर, एक मृत्यू इतर राज्यातील आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 65,168 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 35 हजार 420 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 62 पुरुष तर 37 महिला आहेत. त्यातील 48 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 49 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर, 2 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 99 रुग्णांपैकी 66 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

# राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील

# मुंबई महानगरपालिका- 38442 (मृत्यू 1227) बरे झालेले (16364)

#ठाणे- 9123 (मृत्यू 182) बरे झालेले 2973

#पालघर- 968 (मृत्यू 30) बरे झालेले 329

#रायगड- 1042 (मृत्यू 39) बरे झालेले 549

#नाशिक – 1111 (60) बरे झालेले 893

#अहमदनगर- 108 (मृत्यू 6) बरे झालेले 57

#धुळे – 140 (मृत्यू 16) बरे झालेले 71

#जळगाव- 607 (मृत्यू 72) 272

#नंदुरबार – 34 (मृत्यू 3) बरे झालेले 20

#पुणे – 7537 (मृत्यू 320) बरे झालेले 3559

#सातारा- 490 (मृत्यू 16) बरे झालेले 148

#सोलापूर- 872 (मृत्यू 68) बरे झालेले 353

#कोल्हापूर- 429 (मृत्यू 4) बरे झालेले 104

#सांगली – 112 (मृत्यू 1) बरे झालेले 55

#सिंधुदुर्ग- 33 बरे झालेले 7

#रत्नागिरी- 242 (मृत्यू 5) बरे झालेले 90

#औरंगाबाद -1462 (मृत्यू 65) बरे झालेले 986

#जालना- 119 बरे झालेले 45

#हिंगोली- 149 बरे झालेले 97

#परभणी- 57 (मृत्यू 1) बरे झालेले 3

#लातूर -118 (मृत्यू 3) बरे झालेले 55

#उस्मानाबाद- 66 बरे झालेले 18

#बीड – 46 बरे झालेले 5

#नांदेड – 108 (मृत्यू 6) बरे झालेले 86

#अकोला – 571 (मृत्यू 28) बरे झालेले 289

#अमरावती- 213 (मृत्यू 16) बरे झालेले 121

#यवतमाळ- 130 बरे झालेले 92

#बुलढाणा – 58 (मृत्यू 3) बरे झालेले 29

#वाशिम – 8 बरे झालेले 6

#नागपूर – 556 (मृत्यू 10) बरे झालेले 353

#वर्धा – 11 (मृत्यू 1)

#भंडारा – 29, बरे झालेले 1

# चंद्रपूर – 25, बरे झालेले 15

# गोंदिया – 61, बरे झालेले 28

# गडचिरोली- 32 बरे झालेले 8

# महाराष्ट्र एकूण रूग्ण – बाधित रुग्ण-(65,168), बरे झालेले रुग्ण- (28,081)

 मृत्यू- (2197), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (9) ,ॲक्टिव्ह रुग्ण- (34,881)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.