Mumbai Threat News: मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी, थेट पाकिस्तानातून मेसेज

एमपीसी न्यूज : संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे.(Mumbai Threat News) पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी हल्ल्याचे सावट आले आहे.

या  हल्ल्यात भारतात असलेल्या 6 जणाची मदत घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे.

Pimpri News: महापालिका शिल्लक 80 हजार राष्ट्रध्वज शासनाला परत करणार

गेल्या 3 दिवसांत दहशदवाद्यांशी संबंधित बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे. या दहशतवादी धमकीने मुंबईसह देशाचं टेन्शन वाढवले आहे.(Mumbai Threat News) मुंबईला उडवून देण्याची धमकी पाकिस्तानातून आली आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला ही धमकी आली आहे. तर काल काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या हवाला एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या मोहम्मद यासीन याला अटक केली आहे. तर त्याआधी रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी बेवारस बोटीत घातक शस्त्रास्त्र सापडली होती.(Mumbai Threat News) त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोटीचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. पण, या सर्व घटनांमुळे ऐन सणासुदीच्या काळात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.