Mumbai: आजारी आईला भेटण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने लॉकडाऊनमध्ये गाठले नवसारी

Mumbai: TV Star Harsh Rajput reaches Navsari from Mumbai in lockdown to meet sick mother

एमपीसी न्यूज – करोनाच्या हाहाकारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यानंतर अनेकजण आपल्या घरापासून लांब अडकून पडले. अशात एका अभिनेत्याने स्वत:च्या गाडीने 668 किलोमीटरचा प्रवास केला आहे. हा अभिनेता म्हणजे स्टारप्लस वाहिनीवरील ‘नजर’ या मालिकेत काम करणारा हर्ष राजपूत!

हर्षने लॉकडाऊनमध्ये मुंबई ते गुजरात प्रवास केला आणि तो प्रवास केला कसा हे त्यानेच सांगितले आहे. एका वृत्तानुसार हर्षला मुंबई ते गुजरात असा प्रवास करायचा होता. त्यासाठी त्याने दोन्ही राज्यांची परवानगी घेतली होती. ‘मला माझ्या आईला भेटायचे होते. त्यामुळे मी दोन्ही राज्यांची परवानगी घेऊन आलो आहे’ असे त्याने म्हटले आहे. हर्षच्या आईची तब्बेत बिघडली होती आणि त्या गुजरातमधील नवसारी येथे एकट्या राहत आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी हर्षदला गुजरातला पोहोचायचे होते.

_MPC_DIR_MPU_II

‘मला माझ्या आईची काळजी वाटू लागली होती. म्हणून मी परवानगी घेऊन आलो आहे. मी गुजरातमध्ये पोहोचताच पोलिसांना माहिती दिली आणि चेकअप करुन घेतले. त्यांनी मला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे. पण मी माझ्या आईकडे आल्यामुळे मी आनंदी आहे. आता ती एकटी नाही’ असे हर्षने पुढे म्हटले आहे.

हर्ष मुंबईमध्ये वडील आणि भावासोबत राहत आहे. पण गुजरातमध्ये राहत असलेल्या त्याच्या आईची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्याने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. हर्षदने प्रवासा दरम्यानचा अनुभव देखील सांगितला आहे. ‘मुंबईहून गुजरातला जातान मला झोम्बी वर्ल्डमध्ये आल्यासारखे वाटत होते. रस्त्याला कोणी माणसे नाहीत. संपूर्ण हायवे रिकामा. पण मी प्रवासादरम्यान काळजी घेतली’ असे त्याने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.