Mumbai: दोन ते तीन महिन्यांत ठाकरे सरकार कोसळणार- रामदास आठवले

Mumbai: Uddhav Thackeray government will collapse in two to three months, says Ramdas Athawale शरद पवार यांनी शिवसेनाचा पाठिंबा काढून महाराष्ट्रात भाजप, रिपाइंबरोबर महायुतीचे सरकार स्थापन केले पाहिजे.

एमपीसी न्यूज- राजस्थानमधील राजकीय नाट्य अद्याप संपुष्टात आलेले नाही. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या भविष्यवरुन एक दावा केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्रातही राजकीय उलथा-पालथ होऊ शकते असे म्हणत राज्यातील उद्धव ठाकरे सरकार कोसळण्याची भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे.

रिपाइंचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आठवले यांनी दावा केला की, महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार कोसळेल. भाजपच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार सत्तेवर येईल.

राजस्थानमधील राजकीय हालचालींवर बोलताना आठवले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरही चर्चा केली. राजस्थान नंतर आता महाराष्ट्राचा क्रमांक आहे. येथेही भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकार येईल, असे त्यांनी म्हटले.

मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले आठवले यांनी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीला समर्थन दिले आहे. ते म्हणाले की, सचिन पायलट, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यशैलीवर नाराज झाले. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सचिन पायलट यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे.

यावेळी त्यांनी शरद पवार यांना भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला. शरद पवार यांनी शिवसेनाचा पाठिंबा काढून महाराष्ट्रात भाजप, रिपाइंबरोबर महायुतीचे सरकार स्थापन केले पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी भरघोस निधीही मिळेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.