Mumbai: यापुढे कोळशाऐवजी अपारंपारिक उर्जेला प्राधान्य; उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Mumbai: Unconventional energy is preferred instead of coal; Decision in the meeting of Deputy Chief Ministers राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- कोळशावर आधारीत वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम स्वरुपाच्या अपारंपारिक उर्जेला प्राधान्य देण्यात यावे यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, दिनेश वाघमारे, प्रधान सचिव (ऊर्जा), सुभाष डुंबरे, महासंचालक महाऊर्जा व इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यात सहवीज निर्मितीचे 2000 मेगावाट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात आणखी सुमारे 1000 मेगावाट भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून पवन वगळता अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढता येणार आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अनुदान अनुसूचित जाती-जमाती , विजा/भज,इमाव, मराठा इत्यादी कंपोनंट मधून करण्यात येणार आहे.

पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक (व्यक्तीगत लाभार्थी) विविध योजनांचा या धोरणात समावेश करण्यात आला असून, शहरी घनकचऱ्यापासून वीज निर्मिती व बायो सीएनजी प्रकल्पांचा विकास यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.