Mumbai : वांद्रे रेल्वेस्थानकासमोर मोठी गर्दी गोळा केल्याच्या आरोपावरून विनय दुबे याला अटक

एमपीसी न्यूज – लॉक डाऊनचे पालन न करता परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना घरी परत जाण्याच्या आशेवर मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर एकत्र जमविल्याच्या आरोपावरून उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोलीतून काल रात्री (मंगळवार) अटक केली. आपल्या मूळगावी परत जाण्यासाठी रेल्वेची मागणी करत हजारोच्या संख्येने मजूर काल वांद्र्यात जमले होते.

विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. त्याच्या आवाहनामुळेच काल बांद्र्यात गर्दी जमल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुबेसह सुमारे एक हजार अज्ञातांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचे नियम तोडल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लॉकडाऊन असताना वांद्रे परिसरात काल दुपारनंतर जवळपास चार हजार मजुरांचा मोठा जमाव जमल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. संचारबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमाव आल्याने नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला होता. या प्रकारानंतर वांद्रे रेल्वे स्थानक मुंबई महापालिकेने पूर्णपणे निर्जुंकीकरण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.