Mumbai : कतरिना शोएब अख्तरला सलमानबद्दल काय बरं म्हणाली ?

एमपीसी न्यूज : अभिनेता सलमान खान आणि त्याच्या हिरॉइन्स यावर नेहमीच प्रचंड चर्चा होत असते. मात्र, सलमानने अजूनही लग्न का केले नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ऐंशीच्या दशकातील शेवटच्या वर्षांमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा सलमान आजही हिट चित्रपट देतच असतो. त्याचा स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांना सलमानने पडद्यावर काहीही केले तरी चालते.

आजवर सलमानच्या आयुष्यात अनेक हिरॉइन्स आल्या नी गेल्या. सध्या लॉकडाऊनच्या काळात तो त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बरोबर आहे. जॅकलिन तिथे काय करते हा प्रश्न तुम्हाला पडला ना, तर तिने तिथे एक शॉर्टफिल्मदेखील बनवली आहे.

याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. परंतु, यावेळी फॉर अ चेंज कतरिना सलमानमुळे नाही तर चक्क पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब अख्तरमुळे चर्चेत आहे. ‘कतरिनाने माझ्याकडे येउन सलमानबद्दल तक्रार केली होती.’ असा दावा शोएबने केला होता.

सध्या शोएब अख्तरचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शोएब म्हणतोय, ‘बंगळुरुमध्ये असताना कतरिना व माझी भेट झाली होती. त्यावेळी कतरिना मला म्हणाली, सलमान आणि तुला न्यूजच्या बाहेर ठेवणं अशक्य आहे. तुम्ही दोघं नेहमीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये असता.’ यानंतर त्याने शाहरुख खान आणि इतर बॉलिवूड कलाकारांचे किस्से सांगितले.

हा २००८चा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी खेळाडू आणि कॉमेन्टेटर रमीज राजा यांनी जिओ टीव्हीसाठी शोएब अख्तरची मुलाखत घेतली होती. त्यावेळी बॉलिवूड कलाकारांचे किस्से सांगत असताना शोएबने हा कतरिना सलमानचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी सलमान आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.