Mumbai : दीपिका रणबीरची जोडी पुन्हा जमणार ?

एमपीसी न्यूज : एकेकाळी एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले असताना दीप्स आणि रणबीरने अनेक चित्रपट केले होते. ‘बचना ऐ हसिनो, ‘ जवानी है दिवानी’ या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.  त्यानंतर आता पुन्हा एकदा  दीपिका आणि रणबीर ही जोडी प्रेक्षकांच्या आग्रखातर पुन्हा एकदा एकत्र झळकणार अशी चर्चा आहे.

दीपिका रणवीर सोबत संसारात रमली. रणबीरदेखील दीपिका, कतरिना नंतर आलियाबरोबर रोमान्स करत असल्याच्या बातम्या आपण चवीने वाचल्या. त्यातच वडील ऋषी कपूर यांच्या आजारपणात आणि त्यांच्या निधनानंतर आलियाने कपूर कुटुंबियांना चांगली साथ दिली. ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार अशा बातम्या येऊ लागल्या आहेत.

यातच दीपिका आणि रणबीर ही जोडी प्रेक्षकांच्या आग्रखातर पुन्हा एकदा एकत्र झळकणार अशी चर्चा आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात रणबीर, दीपिका पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसतील अशी शक्यता आहे. संजय लीला भन्साळी यांनीच रणबीरला ब्रेक देताना ‘सावरिया’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.

_MPC_DIR_MPU_II

‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी आपल्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहेत. ‘बयजु बावरा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. दीपिका आणि रणबीरची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.

जेव्हा त्यांनी या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी त्यांना दीपिकासोबत रणबीरला कास्ट करण्याचा सल्ला दिला.

परिणामी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्यांनी रणबीर आणि दीपिकासोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप दोघांनी या चित्रपटाला होकार दिलेला नाही. त्यामुळे येत्या काळात संजय लीला भन्साळी चित्रपटाची अधिकृत घोषणा करतील.

आता हे एक्स बॉयफ्रेंड -गर्लफ्रेंड परत आपला तोच जुना करिश्मा दाखवू शकतील, का हीच रसिकांना उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1