Mumbai : लॉकडाऊन नंतरचे क्रिकेट बदलणार ? जाणून घ्या कोणते नवीन नियम होणार लागू 

Will post-lockdown cricket change? Find out what new rules will apply

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन सुरू झाला आणि याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. पण आता लॉकडाऊननंतरच क्रिकेट पूर्णपणे वेगळं असेल का  काही नियम बदलतील याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले असून खेळाडूंना मैदानातल्या त्यांच्या सवयी यामुळे बदलाव्या लागणार आहेत.  खेळाडूंना सरावादरम्यान शौचालयाला जायला आणि अंपायरना टोपी किंवा गॉगल द्यायला परवानगी मिळणार नसल्याची माहिती ICC मार्फत देण्यात आली आहे.

ICC ने दिलेल्या माहितीनुसार खालील नियमांचे बदल अपेक्षित आहेत.

# खेळाडू त्यांची टोपी, टॉवेल, गॉगल, स्वेटर अंपायरकडे देऊ शकणार नाहीत.

# खेळाडूंनी एकमेकांपासून शारिरिक अंतर ठेवणे अनिवार्य असणार आहे.

# अंपायरनी बॉल पकडताना हातमोजे वापरावेत, अशी सूचना ICC ने केली आहे.

# खेळाडू त्यांची टोपी आणि गॉगल मैदानात ठेवू शकणार नाहीत. टोपी आणि गॉगल मैदानात ठेवल्यास पेनल्टी रन दिल्या जातील असे ICC ने स्पष्ट केले आहे.

# खेळाडूंनी मॅचच्या आधी आणि नंतर कमीत कमी वेळ ड्रेसिंग रूममध्ये घालावा, असंही आयसीसीने सांगितलं आहे.

# खेळाडूंनी बॉलला हात लावल्यानंतर डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये.

# खेळाडूंना शौचालयाचा वापर करायलाही बंदी घालण्यात आली आहे.

आयसीसीच्या क्रिकेट समितीने याआधीच खेळाडूंनी बॉलवर थुंकी किंवा लाळ लावू नये, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर क्रिकेट सुरू जरी झाले तरी खेळाडू आणि अंपायर यांना सुद्धा वरील नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.