Mumbai : ब्रह्मास्त्र’मध्ये WWE मधील ‘या’ सुपरस्टारची एण्ट्री होणार?

0
एमपीसीन्यूज : सध्या लॉकडाऊनमध्ये चित्रपट प्रदर्शन बंद असले तरी लॉकडाऊन संपल्यानंतर  रणबीर कपूर, आलिया भटचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होणार आहे. त्यात रणबीर सोबत आलिया असल्याने त्याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

कारण त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगणार याचीच चर्चा आहे. यात आणखी एका वेगळ्या व्यक्तीची नुकतीच एन्ट्री झाली आहे.  तो भारतातील सर्वोत्कृष्ट किक बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो म्हणजे सौरव गुर्जर.

‘महाभारत’या  २०१३ मध्ये स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेत सौरवने भीम साकारला होता. त्यानंतर तो आता ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार असल्याचे समजते. यात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ती त्याची पहिली मालिका होती. त्यामुळे अभिनय समजून घेण्यासाठी त्याने रजित कपूरची शिकवणी घेतली.  मूळच्या मध्यप्रदेशच्या सौरवला त्यांनी हिंदी भाषा बोलायला शिकवली. सौरव हा भारतातील सर्वोत्कृष्ट किक बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शिवाय अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन देखील दिसणार आहे. एकंदरीत चित्रपटाची तगडी स्टार कास्ट पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like