Mumbai : आमची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात येता येणार नाही ; राज ठाकरे यांचे योगी आदित्यनाथ यांना रोखठोक उत्तर

You cannot come to Maharashtra without our permission; Raj Thackeray's stern reply to Yogi Adityanath

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे स्टाईल उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना आत येता येणार नाही, हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील, तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल, असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

असं असेल तर मग, यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख ठेवूनच त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश द्यावा, हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा, अशी सूचना राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला केली आहे.

राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी, हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो, असं राज ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.