Mumbai : ऐश्वर्याच्या लहानपणीच्या फोटोवर लाइक्सचा वर्षाव

एमपीसी न्यूज : फक्त भारतीय सिनेसृष्टीतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. आपल्या आरस्पानी सौंदर्याने ती आजही चाहत्यांना घायाळ करते. इन्स्टाग्रामवर सध्या तिच्या लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही तिला ओळखलंत का ?

एका बर्थडे पार्टीतील हा फोटो दिसत असून ऐश्वर्या त्यात मित्र-मैत्रिणींसोबत दिसत आहे. पहिल्या फोटोत हास्यानेच तिची ओळख सहज पटते. तर दुसऱ्या फोटोत तिचे डोळे खूप काही बोलून जातात. पांढ-या फ्रॉकमधली ऐश्वर्या लहानपणीदेखील तितकीच सुंदर दिसत होती.

ऐश्वर्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरंच उशिरा पदार्पण केलं. मात्र, पदार्पण करताच तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. ऐश्वर्याच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.