BNR-HDR-TOP-Mobile

Pune : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी मूनव्वर कुरेशी

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदाची माळ मूनव्वर कुरेशी यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांना वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून निवड प्रक्रिया चालू होती. अखेर आज अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

कुरेशी हे इंडियन मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष म्हणून गेली 20 वर्ष काम करीत आहेत. पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. मुस्लिम समाजाबरोबरच दलित समाजात त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. वंचित आघाडीच्या स्थापनेपासून ते आघाडीत हिरारीने काम करीत होते .आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर त्यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3