Modi Government : महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी – हेमंत पाटील

एमपीसी न्यूज – देशातील बहुतांश राज्यांत पेट्रोलचे दर 120 रुपये लिटर झाले आहेत. घरगुती गॅसच्या दराने हजार रुपयांपर्यत उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही काढत नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. यावरून महागाई आटोक्यात आणण्यात मोदी सरकार (Modi Government) अपयशी ठरले आहे.पंतप्रधानांनी मन की बात ऎवजी सामान्यांच्या मनातली गोष्ट ऒळखावी,  असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केले.

गेल्या दोन वर्षांत पेट्रोल 69.59 रुपये लिटरवरुन 120 रुपये लिटरपर्यंत पोहचले आहे.दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किंमतीत घट झाली होती.तरी देखील सरकारी तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकारकडून कुठल्याही प्रकारची कपात करण्यात आली नाही.आता मात्र तुटपुंजी कर कपात करून पंतप्रधान महागाईचे खापर राज्यांवर फोडत आहेत. भाजपचे हे दुटप्पी धोरण नागरीकांच्या (Modi Government) लक्षात आले आहे.

Pune News : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय शाळेचे भूमिपूजन,शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – अजित पवार

मे 2020 मध्ये घरगुती गॅस 581.50 रुपयांना मिळत होता,परंतू दोन वर्षात त्याच्या किंमतीत वाढ होऊन 999.50 रुपयांना तो नागरीकांना घ्यावा लागत आहे.आगोदरन कोरोनामुळे सर्वसामान्या पिचला आहे.आता त्याला महागाईच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. अच्छे दिनचे (Modi Government) स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सामान्यांचे स्बप्न भंग केले आहे. लवकरच महागाई कमी करण्याबाबत दिल्ली दौरा करणार असून विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहीती पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.