Mundhwa : बेबी कॅनॉलमध्ये मैलापाणी; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

एमपीसी न्यूज – मुंढवा येथील जॅकवेलमधून १७ १/२ नळी हडपसर येथील बेबी कॅनालमध्ये मैलापाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या अरिग्यावर परिणाम झाला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांना या ठिकाणी दि. १९ जुलै रोजी प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली होती. त्यावेळी त्यांनी उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला आता ५ महिने होऊन गेले आहेत तरी मनपाकडून कसलीच कारवाई केली गेली नाही. त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे.

मैला पाण्यामुळे बेबीकॅनालच्या दोन्ही बाजूंना राहणारे हजारो नागरिक दुर्गधी, रोगराई, डास यांमुळे त्रस्त झाली आहेत. कॅनालच्या दोन्ही बाजूंकडील विहिरींचे व बोअरवेलचे पाणीही दूषित झाले आहे. आरोग्यावर  गंभीर परिणाम होत असून १७१/२ नळी, महादेवनगर, लक्ष्मी काॅलणी, फुरसुंगी, शेवाळेवाडी येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.