Pune : महापालिका प्रशासन सत्ताधारी, आयुक्त महापौर तर, महापौर झाले आयुक्त

महापालिका वर्धापन दिनानिमित्त गाजली उलटा - पुलटा अभिरुप मुख्यसभा

0

एमपीसी न्यूज – एरवी महापालिका प्रशासन वर्षभर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचेही टीकेचे धनी ठरते. शुक्रवारी दुपारी चित्र मात्र उलटेच घडले. त्याला निमित्त ठरले पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उलटा – पुलटा अभिरुप मुख्यसभेचे.

यावेळी आयुक्त शेखर गायकवाड हे महापौर झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ हे आयुक्त झाले होते. अतिरिक्त आयुक्त म्हणून सभागृह नेते धीरज घाटे, पीएमपीएमएलच्या अधिकारी म्हणून विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसचिव म्हणून नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, उपनगरसचिव म्हणून शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, सुशील मेंगडे, सभागृह नेते म्हणून नगरसचिव सुनील पारखी, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी भूमिका निभावली. यावेळी विविध मजेशीर ठराव मांडण्यात आले.

अधिकाऱ्यांसोबतच पत्रकारांनीही चर्चेत सहभाग घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख म्हणून नगरसेविका नंदा लोणकर यांनी भूमिका केली. 1988 – 89 पासून आशा प्रकारची सभा होत असल्याचे सुनील पारखी यांनी सांगितले. माजी महापौर अंकुश काकडे यांनी ही सभा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like