Pune : खराडीत रखडलेल्या कामांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज – खराडीत रखडलेली मुख्य रस्त्याची कामे, त्यांना जोडणारे उपमार्ग, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचे अर्धवट राहिलेले काम, मगरपट्टा व खराडीमधील जोडणाऱ्या मार्गाचा प्रलंबित प्रश्न व नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, याची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली.

माजी आमदार बापूसाहेब पठारे, स्थानिक नगरसेवकांनी परिस्थिती निदर्शनास आणून दिली. बरेच काम झाले असून काही शुल्लक कारणांमुळे ही कामे अर्धवट राहिल्यामुळे या भागातील विकासाला खीळ बसली आहे. मागील काही दिवसांपूर्वी माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक महेंद्र पठारे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी भेट दिली.

प्रभागामधील बावीस ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी प्रलंबित विकासकामांच्या मागील कारणेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. बाळासाहेब पठारे, सागर कांबळे, प्रयाग पठारे, आकाश कांबळे व महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसमवेत मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. सदर विकास कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांकडून यावेळी देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.