Pune : महापालिका आयुक्तांचा पुणेकरांशी खुला संवाद

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी कार्यालयीन वेळातील नागरिकांचे भेटीच्या दुपारी ३ ते ५ या वेळात मनपाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील तळमजला येथे नागरिकांशी संवाद साधला.

उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधून निवेदने सादर केली. विविध विभागांशी संबंधित सुमारे २७ निवेदने प्राप्त झाली. प्रत्येक निवेदन सादर करणाऱ्या व्यक्तींशी मनपा आयुक्तांनी सविस्तर चर्चा केली. निवेदनांवर कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सदरचे निवेदने संबंधित खात्याकडे पाठविण्यात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम दर सोमवार व शुक्रवार दुपारी ३ ते ५ या वेळात पुढील काळात आयोजित केला जाईल, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.