BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अर्बन-९५ प्रकल्प विकसित करण्याकरिता पालिकेचे सहकार्य

अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांची माहिती

एमपीसी न्यूज – शहरातील विविध रस्ते, उद्याने, मनपाच्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी अर्बन-९५ अंतर्गत लहान मुलांच्या अर्थात ९५ सेंटीमीटर उंची असलेली लहान वयोगटातील मुले-मुली यांच्या एकूणच वाढीसाठी पूरक असलेल्या बाबी, वस्तू, खेळणी, आकर्षक वातावरण निर्मिती, त्यांच्या एकूणच वयोगटास पूरक व यशस्वी ठरतील अशा उपाययोजना, विविध प्रकल्पात राबविणेकरिता संस्थांनी सूचित केलेल्या रचना, उपाय योजनांना महापालिका स्तरावरुन आवश्यक सहकार्य केले जाईल असे अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

महानगरपालिका मुख्य भवनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रुबल अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. शहरातील रस्ते, उद्याने, विविध प्रकल्पात ज्या ज्या ठिकाणी अर्बन-९५ अभियाना अंतर्गत सुशोभिकरणासह लहान मुलांचे एकूणच विकासाकरिता उद्यानातील व विविध प्रकल्पात उपयुक्त ठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून जंगल जीम, खेळ, कलात्मक कट्टे, कोपरे, झाडांना कुंपणे, विविध रंगसंगती, कलात्मक खेळांच्या रचना, ओपन जीम, मुलांच्या आवडीकरिता विविध रंगसंगती व खेळरचना अशा विविध प्रकारच्या प्रकल्पाकरिता पालिकेच्या संबंधित खात्यांमार्फत नियोजन करुन उपक्रम विकसित केले जातील, याकरिता आवश्यक मान्यतेसह अंदाजपत्रकीय तरतूदी, सीएसआर अंतर्गत सहाय्य व या सर्व बाबींना अनुसरुन विविध संबंधित खात्यांनी करावयाची कामे याबाबत कार्यालयीन परिपत्रकांद्वारे विविध खात्यांना सूचित केले जाईल असे अगरवाल यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यकारी अभियंता दिनकर गोंजारे यांनी सांगितले की, बर्नार्ड वन लिअर फाऊंडेशन यांचे वतीने अर्बन-९५ अर्थात लहान वयोगटातील मुला-मुलींच्या एकूणच विकासाकरिता विविध प्रकल्पांवर यशस्वी कामे केली जात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकल्पांना विशेष महत्व प्राप्त होऊ लागले आहे. पुणे, भुवनेश्वर, जयपूर अशा विविध शहरातून तसेच ब्राझील, इस्तंबूल, तेलअव्हिव अशा परदेशातही असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.