BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Saudagar : अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

0 1,183
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने पिंपळेसौदागर परिसरातील अतिक्रमणावर आज (बुधवारी)कारवाई केली.

रस्त्यावरील हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपळेसौदागर परिसरात अतिक्रमण झाले आहे. काटेपूरम चौक, मयूरनगरी, कृष्णा चौक, फेसम चौक, रामकृष्ण चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. सात हातगाड्या, चार लोखंडी काऊंटर, एक लाकडी काऊंटर, आठ लोखंडी जाळ्या, 17 स्टॅन्ड बोर्ड, एक लोखंडी काट, जाहिरात बोर्ड, एक दुचाकी, दोन छत्री स्टॅण्ड, लाकडी, लोखंडी बाकडे जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले साहित्य नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्डेडियम येथे जमा करण्यात आले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3