Nigdi : अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील अतिक्रमणावर आज (सोमवारी) धडक कारवाई केली. हातगाड्या, टप-या जप्त करण्यात आल्या आहे. 

‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील यमुनानगर पोलीस चौकीसमोरील तसेच कस्तुरी मार्केट, नेवाळे चौक येथील विनापरवाना हातगाडी, टप-यांवर आज धडक अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यामध्ये 16 हातगाडी, एक टपरी, एक लोखंडी काऊंटर जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य नेहरुनगर येथील कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करण्यात आले आहे.

कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.