Pimpri : महापालिका महासंघ निवडणूक; मतमोजणीला सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान झाले. 82 टक्के मतदान झाले आहे. मतदान करण्यासाठी कर्मचा-यांची सकाळपासूनच महापालिकेच्या आवारात गर्दी होती. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.  

या निवडणुकीसाठी स्व. शंकर अण्णा गावडे कर्मचारी महासंघ आणि आपला महासंघ या दोन पॅनेलमध्ये लढत होती. गावडे कर्मचारी महासंघाचे बॅट तर आपला महासंघाचे कपबशी निवडणूक चिन्ह होते. कार्यकारिणीच्या आठ जागांसाठी 16 जण तर 13 सदस्यपदांसाठी 26 जण असे मिळून 42 जण निवडणुकीच्या रिंगणात होते.

11 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सुमारे सात हजार मतदार असून तब्बल 5733 जणांनी मतदान केले आहे. टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी दिवसभर गर्दी होती. सायंकाळी सहानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.