Pimpri : पहिल्या सहामाहीत महापालिकेला 740 कोटी रुपयांचे उत्पन्न

गतवर्षीपेक्षा 283 कोटींचे जादा उत्पन्न;  61.99 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019-20 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल 740 कोटी 44 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये बांधकाम परवाना विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. मागील वर्षी 1 एप्रिल ते 20 सप्टेंबर 2018 या कालावधीत 457 कोटी 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीपेक्षा 283 कोटी 36 लाख रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले असून ही वाढ 61.99 टक्के आहे.

यामध्ये बांधकाम परवानगी विभागाला सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात या विभागाला 350 कोटी जमेचे उद्दीष्ट दिले होते. 346 कोटी 9 लाख रुपये इतके उत्पन्न बांधकाम परवानगी विभागाकडून मिळाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

स्थानिक संस्था कर (एलबीटी) च्या उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडून करनिर्धारण करण्यात येणार आहे. त्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महापालिकेने खासगी सनदी लेखापालांकडून याबाबत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार एकूण 18 सनदी लेखापालांचे स्वारस्य प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 8 सनदी लेखापाल यांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत.

त्यांच्याकडून स्थानिक संस्था कर विभागाकडील प्रलंबित करनिर्धारण प्रकरणाची करनिर्धारण करून घेण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रलंबित करनिर्धारण प्रकरणातून पुढील 3 महिन्यात महापालिकेस अंदाजे शंभर कोटी रुपये इतके उत्पन्न मिळण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.