Pimpri : महापालिकेतर्फे सदनिकांची सोडत, 294 लाभार्थ्यांना हक्काचे घर

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या घरकुल प्रकल्पातील 7 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकूण 294 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज (शनिवारी) काढण्यात आली.

‌पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेली संगणकीय सदनिका सोडत महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या शुभहस्ते काढण्यात आली. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे (झोनिपु) सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर,  प्रशासन अधिकारी नंदकुमार वाघ, मुख्य लिपिक सुनील माने, राजेश जाधव, संगणक चालक सुजाता कानडे, उज्वला गोडसे, दीपक पवार, संगणक अभियंता संदीप भागवत, लिपिक योगिता जाधव, अंजली खंडागळे, सुवर्णा केदारी, संकेत लोंढे तसेच समन्वयक अशोक हंडीबाग, दर्शन शिरुडे, आश्विनी शिंदे व राजश्री शेंडगे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. 130 इमारत क्र. डी-1 चे अध्यक्ष फिलिप मुरलीधर बागुल, सोसायटी क्र. 131 इमारत क्र. सी-15 चे अध्यक्ष संजय आण्णासाहेब शिंदे, सोसायटी क्र. 132 इमारत क्र. सी-14 चे अध्यक्ष महेश मच्छिंद्र सावंत, सोसायटी क्र. 133 इमारत क्र. डी-2 चे अध्यक्ष दत्तात्रय नारायण गोळे, सोसायटी क्र. 134 इमारत क्र. डी- 4 चे अध्यक्ष अशोक गुंडिबा डोरले, सोसायटी क्र. 135 इमारत क्र. डी- 27  चे अध्यक्ष राजाराम धारु कदम व सोसायटी क्र. 136  इमारत क्र. डी-3 चे अध्यक्ष सुधाकर पुरुषोत्तम देशपांडे यांचा चंद्रकांत इंदलकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी लाभार्थ्यांना केले.

चंद्रकांत इंदलकर यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.