Pune : 5 दिवसांच्या आठवड्यामुळे महापालिकेत शुक्रवारी नागरिकांची तोबा गर्दी

एमपीसी न्यूज – राज्य शासना पाठोपाठ पुणे महापालिकेतही 5 दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 29 फेब्रुवारी) पासून होणार आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) महापालिकेच्या सर्वच कार्यालयात तोबा गर्दी पाहायला मिळाली.

महापालिका कर्मचाऱ्यांची कामाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवारी सुट्टीचे दिवस असणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.