Pune news: महापालिका करणार आरोग्य विभागाचं ऑडीट !

Municipal Corporation to audit health department!Municipal Corporation to audit health department!Municipal Corporation to audit health department!

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची परिणामकारकता आणि व्यापकता वाढविण्यासाठी ऑडीट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

आरोग्य विभागाकडील निधी, निविदांवरील खर्च, ठेकेदारी, त्याचे परिणाम आणि प्रत्यक्षातील साहित्य आणि सेवांचा दर्जा यांची तपासणी केली जाईल. त्यात त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाईसोबत यंत्रणेत तातडीने बदल केले जाणार असल्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून पुणे शहरवासियांसाठी विविध योजनांवर वर्षाकाठी तब्बल 350 कोटी रुपये खर्च केले जातात. गेल्या काही वर्षांत शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही आरोग्य व्यवस्थेतील विशेषत: रुग्णालयांतील उपचार सुविधांपासून शहरी गरीब योजना, अंशदायी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आक्षेप घेतले जात होते.

त्यातही कोरोनाच्या काळातही महापालिकेकडे पुरेसे बेड, ऑक्‍सिजन आणि अतिदक्षता विभाग नसल्याने गरीब रुग्णांचे हाल झाले. या पार्श्‍वभूमीवर या आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याचा मोठा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, पुणे शहराची हद्द आणि त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्याची सेवा-सुविधांची उभारणी केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक घटकाला मोफत आणि आवश्‍यक ती उपचार व्यवस्था उपलब्ध होईल. त्यासाठी नव्याने आराखडा तयार करीत आहोत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.