PCMC News : महापालिका सात जलतरण तलाव ‘पीपीपी’ तत्वावर चालविण्यास देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) सात जलतरण तलाव खासगी-सार्वजनिक तत्वावर (पीपीपी) चालविण्यास देणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली. तलावावरील वाढता खर्च कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) शहरात 14 जलतरण तलाव आहेत. खेळाडूंसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंना तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून प्रशिक्षण उपलब्ध करुन  देण्याची मागणी होत आहे. या तलावांचा खर्च अधिक असल्याने खर्च कमी करुन महापालिकेला उत्पन्न मिळाले. त्यादृष्टीने आरएफपी करुन सात तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहेत.

Yajuvendra Mahajan : समाजाला जास्तीत जास्त योगदान देण्याचा विचार करतो त्याचे जीवन कृतार्थ ठरते – यजुर्वेंद्र महाजन

कासारवाडी, पिंपरीवाघेरे, यमुनानगर, निगडी, पिंपळेगुरव, वडमुखवाडी च-होली आणि नेहरुनगर येथील असे सात जलतरण तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास दिले जाणार आहेत. महापालिकेतील नगरसेवकांचा कालावाधी 13 मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे महापालिकेवर आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वसाधारण सभेचे अधिकार प्रशासकांना दिले आहेत. त्यानुसार या विषयाला प्रशासकांनी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.